महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढायची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना दिली. गृहविभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या एकंदर ४८ शहरांमध्ये ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक राहतात. या सर्व नागरिकांना आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत देशातून बाहेर काढलं जाईल, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.
Site Admin | April 27, 2025 1:35 PM | CM Devendra Fadnavis | Maharashtra | Pahalgam Terror Attack | Pakistani
पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
