कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी, शासकीय कारभारात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात आज सामंजस्य करार झाला. या भागीदारीअंतर्गत मुंबईत भूगोल विश्लेषण केंद्र, पुण्यात न्यायपूरक विज्ञान संशोधन आणि ए.आय. केंद्र, तर नागपूर – मार्व्हेल केंद्र, अशी तीन ए.आय. उत्कृष्टता केंद्रं राज्यात स्थापन केली जातील.
शासनाच्या सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकहितैषी बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट Copilot तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शासनाच्या विविध कार्यप्रणालींमध्ये लक्षणीय सुधारणा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, आदी यावेळी उपस्थित होते.