महायुतीमध्ये कसलाही वाद नाही असं सांगत महाराष्ट्रात येत्या गुरुवारी 5 डिसेंबर ला शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उपमुख्यमंत्री बनतील असं त्यांनी काल स्पष्ट केलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ५ डिसेंबरला मुंबईतल्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजमाध्यमावरून दिली आहे.
Site Admin | December 1, 2024 7:15 PM | Maharashtra | Mahayuti Sarkar