महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी काल रात्री मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा देखील यावेळी उपस्थित होते. भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीत अमित शहा यांनी दिलेलं पाठबळ आणि सहकार्याबद्दल भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. शहा यांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली; त्यांना प्रेरणा दिल्याचं फडणवीस यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
Site Admin | November 29, 2024 1:41 PM | Maharashtra | mahayuti
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत अमित शहा यांच्यासमवेत बैठक
