महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड झाल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांना सभापतींच्या खुर्चीवर आसनस्थ केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्या बद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले .
Site Admin | December 19, 2024 1:49 PM | Maharashtra Legislative Council | MLA Ram Shinde