डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधान परिषदेच्या आज झालेल्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व ९ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीच्या ३ पैकी २ उमेदवारांना विजय मिळवता आला.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणारे शेकापचे जयंत पाटील या निवडणुकीत पराभूत झाले.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी आज विधान सभेच्या सर्व २७४ आमदारांनी मतदान केले. त्यातून भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे विजयी झाले.  राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी शिवसेनेकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी विजय मिळवला. 

महविकास आघाडीतल्या काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर या निवडणुकीत विजयी झाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा