राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपकडून संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आज आपले अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनीही अर्ज भरला. तर अपक्ष उमेदवार उमेश म्हेत्रे यांनीही अर्ज दाखल केला आहे.
ही निवडणूक २७ मार्च रोजी होणार आहे आणि त्याचदिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल. आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.