महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गैरवर्तन केल्याबद्दल दोन कुस्तीगीरांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य कुस्तीगीर परिषदेनं घेतला आहे. अहिल्यानगर इथं काल या स्पर्धेचा समारोप झाला. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोन कुस्तीगीरांनी पंचांशी वाद घातला. राक्षेनं एका पंचाला लाथ मारली तर अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडने पंचांना शिवीगाळ केली असे आरोप त्यांच्यावर असून पुढची ३ वर्ष त्यांनी कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
Site Admin | February 3, 2025 8:51 PM | Maharashtra Kesari
महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर राज्य कुस्तीगीर परिषदेकडून ३ वर्षांसाठी बंदी
