कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रशासनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात मुंबईत सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कराराअंतर्गत मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी एआय कौशल्य आणि उत्कृष्टता केंद्र उभारली जाणार आहेत. मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठी, पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी तर नागपूरमध्ये प्रगत AI संशोधना संदर्भातील केंद्र स्थापन केलं जाणार आहे.
Site Admin | April 16, 2025 9:34 AM | IBM | Maharashtra
महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार
