डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

येत्या दोन दिवसात राज्यात उष्णतेची लाट

येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत उष्णतेची लाट कायम असून आज आणि उद्या कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सियस इतकं राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या दरम्यान किमान तापमान २३ अंश सेल्सियस राहील. सोमवारी किमान तापमानात एका अंशाची घट दिसून येईल, असंही हवामान विभागाने कळवलं आहे.

 

गेल्या चोवीस तासात, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती, विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. 

 

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रूपूर इथं ४२ अंश सेल्सिअस  सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर इथं १७ पूर्णांक ५ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा