महायुतीच्या नेत्यांनी आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडनवीस, अजित पवार, आणि इतर नेत्यांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या एकूण २३७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं. यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन, आणि भाजपा नेते विजय रूपाणी देखील उपस्थित होते.
राज्यपालांकडे जाण्याआधी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली. त्यानंतर, हे तिन्ही नेते एकाच गाडीतून राजभवनाकडे रवाना झाले.