डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वस्त्रोद्योग क्षेत्रात बदल केल्यास हे क्षेत्र आघाडीवर राहील – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

कृषी क्षेत्रानंतर वस्त्रोद्योग हे सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र असून वस्त्रोद्योग क्षेत्रात आधुनिकीकरण आणि कालानुरुप बदल केले तर भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्र आघाडीवर राहील, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉटन टेक्सटाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल या संस्थेचा ७०वा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळा काल मुंबईत झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते वस्त्ररत्न, वस्त्रभूषण, वस्त्र शिरोमणी पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल  सुरेश कोटक यांना ‘वस्त्र शिरोमणी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा