गुइलेन बॅरे आजाराचं निदान झालेल्या दोन रुग्णांचा आज पुण्यात मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात या आजारानं मरण पावलेल्यांची संख्या आता ४ झाली आहे. आज मृत पावलेल्यांमध्ये एका टॅक्सी चालकाचा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. राज्यात गुइलेन बॅरे आजाराच्या संशयित रुग्णांची संख्या १३० वर पोहोचली असून यापैकी २० रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
Site Admin | January 31, 2025 7:19 PM | GBS | Maharashtra
राज्यात जीबीएस आजारामुळे ४ जणांचा मृत्यू
