जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रसरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला आज सुरुवात झाली. पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या ५ जिल्ह्यांतल्या मिळून ३४ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मोहिमेचं उद्घाटन दूरदृष्यप्रणालीमार्फत केलं. हा दुर्धर आजार असून तो क्युलेक्स डासांच्या चाव्यामुळे होतो. मोहिमेअंतर्गत दोन वर्षांपेक्षा लहान बालकं, गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती वगळता सर्वांना प्रतिबंधक गोळ्यांचा डोस देण्यात येणार आहे.
Site Admin | February 10, 2025 7:00 PM | Maharashtra
राज्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला सुरुवात
