काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलाचा भाग म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अहवालानंतर संघटनेत बदल होतील. या निरीक्षकांची बैठक आज सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हे सर्व निरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून १५ दिवसांत प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर संघटनात्मक फेरबदलांच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.
Site Admin | March 28, 2025 7:40 PM | Congress | Maharashtra
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची जिल्हानिहाय निरीक्षक म्हणून नियुक्ती
