डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सोयाबीन खरेदीसाठी भावांतर योजना लागू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सोयाबीन खरेदी करताना किमान आधारभूत किंमतीतली तफावत दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलं. नांदेडमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी महायुतीच्या आश्वासनांची आठवण उपस्थितांना करुन दिली. 

 

दरम्यान, कांद्याची बेकायदा साठवणूक करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर संबंधित अधिनियमांनुसार  कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पणन विभागाला दिले आहेत. कांद्याची साठेबाजी निदर्शनाला आली तर नागरिकांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातल्या पुरवठा विभागाला माहिती द्यावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा