डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेचे मराठवाडा विभागाचे निकाल जाहीर

महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेचे मराठवाडा विभागाचे निकाल जाहीर झाले असून, नांदेडच्या टायनी एंजल्स स्कूल या संस्थेच्या ’प्लॉट नं. शून्य’, या नाटकानं पहिला क्रमांक पटकावला आहे. नांदेडच्याच शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स या संस्थेच्या ‘आभाळ’ या नाटकाचा द्वितीय, परभणीच्या गोपाला फाऊंडेशन या संस्थेच्या ‘झाले मोकळे आभाळ’ या नाटकाचा तृतीय, तर मंठा इथल्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या ‘लपंडाव’ या नाटकाचा चौथा क्रमांक आला आहे. ही चारही नाटकं अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा