महाराष्ट्रात राज्य शासनाच्या सर्व विभागांनी राज्य मंत्रिमंडळासमोर नवा प्रस्ताव ठेवताना खर्चात अर्थसंकल्पातल्या तरतुदीपेक्षा जास्त झालेल्या वाढीचा स्पष्ट उल्लेख करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. नवीन प्रस्तावात खर्चात झालेली वाढ यामुळे स्पष्टपणे लक्षात येईल, तसंच त्या वाढीसाठी संबंधित विभागाला जबाबदार धरता येणार आहे. वाढलेला खर्च मूळ तरतुदीपेक्षा किती जास्त आहे हे नमूद केल्याशिवाय प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवू नये असे निर्देश सौनिक यांनी दिले आहेत. राजकोषीय तूटीला आवर घालणं हा याचा हेतू असून हा निर्णय एका व्यापक धोरणाचा भाग आहे, असं एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितलं.
Site Admin | March 31, 2025 2:41 PM | Chief Secretary Sujata Saunik | Maharashtra
अर्थसंकल्पातल्या तरतुदीपेक्षा जास्त झालेल्या वाढीचा स्पष्ट उल्लेख करण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
