पालघर जिल्ह्यातल्या देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यामुळं चाळीस लाख लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. यातून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी ६९ दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त आरक्षित असणार आहे.
पुणे जिल्ह्यातल्या दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यातल्या सिंचनासाठीच्या जनाई, शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतर करण्याच्या कामाला आणि त्यासाठीच्या ४३८ कोटी रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.