विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निदर्शने केली. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह धनंजय मुंडे यांची छायाचित्रे झळकावून विरोधकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली तसंच कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आल्याचा आरोप करत सरकारचा निषेध केला.
Site Admin | March 6, 2025 1:31 PM | Maharashtra Budget Session 2025
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं निदर्शन
