छत्रपती संभाजी महाराज यांना अटक झाली त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडला असलेल्या राजमाता जिजाऊंचा राजवाडा अधिग्रहीत करून त्या ठिकाणी शिवसृष्टी प्राधान्याने उभी केली जाईल, असं देखील मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. पाच वेगवेगळ्या महसुली विभागात शिवसृष्टी उभारली जात आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करू असंही देसाई म्हणाले.