डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत – अर्थमंत्री अजित पवार

राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.  ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते.

 

गेल्या १५ वर्षात राज्याचं स्थूल उत्पन्न आणि एकूण कर्ज दोन्ही वाढत गेलं आहे. कर्जाचं स्थूल उत्पादनाशी प्रमाण १६ ते १९ टक्के आहे. २५ टक्क्यापर्यंत आपण कर्ज देऊ शकतो. देशातल्या केवळ ३ राज्यांचं कर्जाचं प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत निराधार आरोप करून राज्याची आर्थिक परिस्थिती खालावल्याचं खोटं चित्र रंगवू नका. त्याचा येणाऱ्या गुंतवणुकीवर थोडा का होईना, परिणाम होतो, असंही अजित पवार यावेळी म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा