डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कापूस खरेदी पारदर्शक होण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील – मंत्री जयकुमार रावल

भारतीय कापूस महामंडळामार्फत सुरू असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून आत्तापर्यंत राज्यात १२४ केंद्रांमार्फत १४२ कोटी ६९ लाख क्विंटल इतकी कापूस खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.

 

या संदर्भातील प्रश्न अमित झनक यांनी उपस्थित केला होता. कापसाच्या खरेदीसाठी भावांतर योजना लागू करावी असा आग्रह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी धरला होता. खुल्या बाजारातले व्यापारी देखील या केंद्रामधून कापूस खरेदी करत आहेत त्यामुळे भावांतराचा विषय उद्भवत नाही.  सीसीआयने लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार ५२१ रुपये हा हमीभाव दिला आहे अशी माहिती देखील रावल यांनी यावेळी दिली.

 

सध्या अस्तित्वात असलेली ३२५ गोदामं कमी पडत असल्याने आणखीन गोदामे मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. १५ मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या सगळ्यांची कापूस खरेदी करण्यात येईल आणि ही मुदत वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन रावल यांनी यावेळी दिलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा