डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ हा अर्थसंकल्पाचा मूळ गाभा – अर्थमंत्री

विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आगामी ५ वर्षांचा विचार करून यंदाचा अर्थ संकल्प सादर केला आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सर्व घटकांचा विकास डोळ्यासमोर ठेवले आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं. अर्थसंकल्पावरील चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते. 

 

राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही. पण गरज संपलेल्या, द्विरुक्ती असलेल्या योजना सरकार बंद करेल. त्यासाठी निधी दिलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. लाडकी बहिण योजना सुरू ठेवताना त्यात दुरुस्ती करण्याची सरकारची भूमिका आहे. दुरुस्ती करताना गरीब महिलांना फायदे मिळत राहतील असं त्यांनी यावेळी नमूद केलं. 

 

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सरकारने योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी शून्य टक्के दराने कृषी कर्ज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. वंचितांसाठी सरकारने भरीव तरतूद केली आहे. महसुल वाढीसाठी आणि खर्च कमी करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत. त्याच वेळी राज्याच्या विविध भागाच्या अनुशेषामध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी क्रांतिसिंह नानासिंह पाटील यांचे स्मारक सांगली जिल्ह्यात उभारले जाईल. नवी दिल्लीत मराठी भाषिक नागरिकांसाठी सांस्कृतिक भवन उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली. राज्यातील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि राज्याच्या विकासाच्या शिखरावर नेण्याचा संकल्प पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी आज दिलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा