डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याला विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प

आगामी वर्षाचा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आणि राज्याला विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणारा, संतुलित असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू आहे, असं त्यांनी आज अर्थसंकल्पानंतर वार्ताहर परिषदेत जाहीर केलं. 

 

राज्यात एक कोटी लखपती दीदी तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असंही ते म्हणाले. 

 

या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारे योजनांना कात्री लावलेली नाही. उलट पायाभूत सुविधांच्या विकासांना वेग दिल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधांचं योग्य संतुलन यात राखल्याचं ते म्हणाले. 

 

राज्याच्या तिजोरीत अधिकाधिक निधी येण्यासाठी केलेल्या तरतुदींची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा