व्यक्तीगत वापराच्या सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरच्या करात १ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. याशिवाय ३० लाखापेक्षा अधिक किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी त्यांनी प्रस्तावित केली. बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एस्कॅव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना तसंच मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर ७ टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्ताव त्यांनी अर्थसंकल्पात मांडला. विविध गोष्टींसाठी लागणारं मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरुन ५०० आणि १ हजार रुपये करण्याचा प्रस्तावही त्यांनी सादर केला आहे.
Site Admin | March 10, 2025 8:12 PM | Maharashtra Budget Session 2025
व्यक्तीगत वापराच्या सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरच्या करात १ टक्के वाढ
