डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर विरोधकांनी बहिष्कार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद असावा, मात्र फक्त चहापानाला जाऊन संवाद होत नसतो, असं महाविकास आघाडीच्या वार्ताहर परिषदेत विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. 

 

सत्ताधारी विरोधकांना सापत्न वागणूक देत आहे, विरोधी पक्षातल्या लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवत आहे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रकाश कोरटकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राहुल सोलापूरकर यांना सरकार पाठीशी घालत आहे, मुंबईतली अनेक महत्वाची कार्यालयं बाहेर नेऊन मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, राज्यावर आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे, हे सरकार शेतकरी, युवक यांच्या विरोधात आहे, अशी टीका दानवे यांनी केलं. 

 

निवडणूका आल्या की सत्ताधाऱ्यांना पक्षांना शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर आठवतात, मात्र त्यांचा अवमान करणाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवायचं हे सरकारचं धोरण आहे अशी टीका कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी केली. 

 

केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली जात असेल तर राज्यात दुसरं कोण सुरक्षित आहे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी विचारला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा