डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जनता, शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका

महायुती सरकारने निवडणूक काळात दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अर्थसंकल्पात केली नाही.  या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने जनतेची फसवणूक केल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. 

 

या अर्थसंकल्पात एसटी, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले असल्याची टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली. शेतकरी कर्जमाफी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा निधी आणखी ३ हजार रुपयांनी वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरू असून आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणणारं हे सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार, असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा