डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते. स्मार्ट मीटर लावणाऱ्या घरगुती ग्राहकांना  दिवसा वापरलेल्या वीजेवर सवलत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. 

 

प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरातही सोलर पॅनल लावून देणार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं बहुवार्षिक वीजदर याचिका सादर करत वीज दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी पाच वर्षांत ग्राहकांना दरवर्षी ९ टक्के दरवाढ सोसावी लागणार नाही, उलट वीज दर २४ टक्क्यांनी कमी होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. 

 

राज्यात ग्रामीण भागातले 14 हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहे.  तसेच १ हजार लोकसंख्या असलेल्या सुमारे ४ हजार गावांमध्ये सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा