मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दहा लाख महिला अपात्र ठरणार आहेत, मग ही योजना राबवतानाच अपात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घेऊ नये याची खबरदारी का घेतली नाही असा प्रश्न कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला. ते पुरवणी मागण्याच्या चर्चेत विधानसभेत बोलत होते. या योजनेच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाने जनतेला लुटलं आहे अशी टीका त्यांनी केली. सत्तेवर आल्यावर लाडकी बहीण योजनेद्वारे प्रतिमाह २१०० रुपये देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं, हे आश्वासन आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात पाळलं गेलं पाहिजे असं पटोले म्हणाले.
Site Admin | March 6, 2025 5:20 PM | Maharashtra Budget Session 2025 | Nana Patole
लाडकी बहीण योजना राबवतानाच अपात्र लाभार्थ्यांनी खबरदारी का घेतली नाही-नाना पटोले
