छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया इमारत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, यासाठी ७३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती, माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभागृहाला दिली.
अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या खर्चात वाढ करण्यासाठी आदिवासी विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचं आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सभागृहाला दिलं. नागरी भागातल्या कुपोषित बालकांनाही पोषण आहार देण्याचा विचार सरकार करत असल्याचं त्यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
जलजीवन अभियानाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल, आत्तापर्यंत ३३७ कंत्राटदारांना नोटीसा बजावल्या असून, यांच्याकडून ९१ लाखांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली.