राज्यातल्या देवस्थान इनाम जमिनी, कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी समिती नेमल्याची महसूल मंत्र्यांकडून विधानसभेत माहिती
राज्यातल्या देवस्थान इनाम जमिनी, कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.
या समितीत आणखी तज्ञांचा समावेश केला जाईल, आणि समितीनं दिलेल्या अहवालानुसार विधीमंडळात विधेयक मांडलं जाईल असं त्यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातल्या वन जमिनी शेतकऱ्यांना देता याव्यात, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, वन विभागाला अन्य जमिनी देऊन या जमिनी सोडवून घेऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं.राज्यातल्या अपूर्ण राहिलेल्या धरणांची कामं पूर्ण करण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवला जाईल असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, उत्तम जानकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितलं.