आगामी आर्थिक वर्षाचा एकूण ७ लाख २० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज सादर केला. त्यात ५ लाख ६० हजार ९६४ कोटी रुपयांची महसुली जमा आणि ६ लाख ६ हजार ८५५ कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे. यात ४५ हजार ८९१ कोटी रुपये तूट अपेक्षित आहे.
२०२५-२६ ची राजकोषीय तूट १ लाख ३६ हजार २३५ कोटी रुपये आहे. त्यामुळं राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरल्याचं अर्थमंत्री म्हणाले. तसंच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या १ टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे, असं त्यांनी सांगितलं.