महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५
महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही – अर्थमंत्री अजित पवार
राज्याचं औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करणार असून ४० लाख कोटींची गुंतवणूक तर ५० लाख रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.
नवीन कामगार संहितेनुसार नवे कामगार धोरण तयार करणार तसंच मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सध्याच्या १४० अब्ज डॉलरवरुन २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर आणि २०४७ पर्यंत दीड ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट – अर्थमंत्री अजित पवार
५ वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव राज्य विद्युत नियामक आयोगाकडे दिल्यामुळे राज्यातले औद्योगिक विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील आणि उद्योगांची १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल – अर्थमंत्री अजित पवार
विमान चालन, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन आणि दळणवळण यासारख्या पायाभूत सुविधा क्षेत्रात येत्या ५ वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा सरकारचा विचार – अजित पवार
गेटवे इंडियापासून मांडवा आणि एलिफंटा पर्यंतच्या जल प्रवासासाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर करणार – अर्थमंत्री अजित पवार
दिघी, वेंगुर्ला, काल्हेर डोंबिवली, कोलशेत, मीरा भाईंदर,मध्ये जेट्टींची कामे प्रगतीपथावर, रायगड जिल्ह्यातल्या काशीदमध्ये लवकच तरंगत्या जेटीचे काम सुरू करणार – अर्थमंत्री अजित पवार
अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा २०२५ ते २०४७ तयार करणार असून याअंतर्गत पर्यटन केंद्र, तीर्थक्षेत्र, धार्मिक स्थळं, गडकिल्ले, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, ५ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली वसाहतीतल्या रस्त्यांचे काम पूर्ण होणार – अर्थमंत्री
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत येत्या आर्थिक वर्षात दीड हजार किलोमीटर लांबीचे रस्ते निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात १४,००० किलोमीटर लांबीच्या रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार, यात १ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली ३ हजार ५८२ गावे जोडणार – अर्थमंत्री अजित पवार
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरच्या मिसिंग लिंकचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार असून समृद्धी महामार्गाचा उर्वरित टप्पा लवकरच सुरू होणार – अर्थमंत्री अजित पवार
ठाण्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन असून ठाण्यात बाळकुम ते गायमुख किनारी मार्ग बांधणार तर, उत्तन ते विरार सागरी सेतू बांधणार – अर्थमंत्री अजित पवार
येत्या वर्षात मुंबईत ४१ किलोमीटर तर पुण्यात २३ किमी मेट्रो मार्ग सुरू होणार तर, येत्या ५ वर्षात राज्यात २३७ किमी मेट्रो मार्ग राज्यात सुरू होणार – अर्थमंत्री अजित पवार
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेणार – अर्थमंत्री अजित पवार
पुढच्या महिन्यापासून नवीमुंबई विमानतळ सुरू करण्याचे नियोजन असून अमरावतीमधले बेलोरा विमानतळ महिनाअखेर सुरू होणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
एसटी महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी अर्थसहाय्य देणार,६ हजार डिझेल बसचे CNG, LNG मध्ये रुपांतर – अर्थमंत्री अजित पवार