राज्यघटनेचं अधिष्ठान लाभल्यामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम झाली आहे, असं प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज केलं. भारताच्या राज्यघटनेची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर ते सभागृहात बोलत होते. राज्यघटनेच्या आधारे प्रगतीचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. स्वातंत्र्य, बंधुता, समता ही मूल्यं लोकशाहीत महत्त्वाची असून आपली लोकशाही जगासाठी प्रेरणादायी ठरतक आहे, असं त्यांनी नमूद केलं.
Site Admin | March 25, 2025 6:48 PM | Maharashtra Budget 2025
राज्यघटनेचं अधिष्ठान लाभल्यामुळे संसदीय लोकशाही अधिक भक्कम झाली – सभापती राम शिंदे
