कोयना प्रकल्पाचा अंतर्भाव कृष्णा खोरे विकास महामंडळात करण्याबाबतची तरतूद असणारं महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयक आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं. कोयना प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद या विधेयकात आहे. या सुधारणांमुळे कोयना प्रकल्पातून होणाऱ्या सिंचन आणि विजनिर्मितीचं व्यवस्थापन कृष्णा खोरे महामंडळाकडे येणार आहे. या प्रकल्पाचं व्यवस्थापन सध्या दोन अभियंते करत असून आता या विधेयकातील सुधारणांमुळे एकाच मुख्य अभियंत्याकडे हे व्यवस्थापन दिलं जाईल असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. कोयना डॅम फूट पॉवर हाऊस हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Site Admin | March 24, 2025 6:25 PM | Maharashtra Budget 2025
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ सुधारणा विधेयकाय मंजूरी
