अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची उपमुख्यमंत्र्यांकडून घोषणा.
- २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार.
- दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी राखीव.
- जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू होणार.
- १७ शहरात १० हजार महिलांना पिंक रिक्षा खरेदीसाठी निधी देणार
- ८० कोटी रुपये राखीव.
- नोंदणीकृत विवाह करणाऱ्या महिलांना १० हजार रुपयांच्या ऐवजी २५ हजार रुपये अनुदान.
- २१ लाखांहून अधिक घरांना नळ जोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर.
- महिलांना स्वच्छ इंधनासाठी – प्रत्येक पात्र कुटुंबाला ३ गॅस सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. ५२ लाख १६ हजार ४१२ पात्र कुटुंबाना लाभ.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची उपमुख्यमंत्र्यांकडून घोषणा.
- २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देणार.
- दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी राखीव.
- जुलै २०२४पासून योजनेची अंमलबजावणी सुरू होणार.
- १७ शहरात १० हजार महिलांना पिंक रिक्षा खरेदीसाठी निधी देणार, ८० कोटी रुपये राखीव.
- नोंदणीकृत विवाह करणाऱ्या महिलांना १० हजार रुपयांच्या ऐवजी २५ हजार रुपये अनुदान.
- २१ लाखांहून अधिक घरांना नळ जोडणी देण्याचे काम प्रगतीपथावर
- प्रत्येक पात्र कुटुंबाला ३ गॅस सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.५२ लाख १६ हजार ४१२ पात्र कुटुंबाना लाभ.
- राज्यातल्या १५ लाख महिला लखपती दीदी झाल्या असून चालू आर्थिक वर्षात २५ लाख महिला लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट.
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू करणार.
- व्यावसायिक शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलींना १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती.
- सुमारे २ लाख मुलींना याचा लाभ मिळेल.
- २ हजार कोटींची तरतूद.
शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद
- खरीप हंगाम २०२३ करता ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.
- शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नागपूर विभागामध्ये चाचणी. केलेली ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू करणार.
- गाव तिथे गोदाम योजना राबवणार.
- पहिल्यांदा १०० ठिकाणी गोदामांची निर्मिती.
- कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना खरीप पणन हंगाम २३-२४मध्ये २ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देणार.
- १ जुलै २०२४ पासून गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान.
- बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रति पीक १७५ रुपये अनुदान देणार.
- नंदुरबार जिल्ह्यापासून योजनेची सुरुवात.
- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना २० लाखांच्या ऐवजी २५ लाख रुपये आर्थिक मदत देणार.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळ
- पंढरपूरच्या वारीची जागतिक वारसा नामांकन म्हणून युनेस्कोला प्रस्ताव सादर करणार.
- वारीतल्या पालख्यांसाठी यंदापासून २० हजार रुपये निधी.
महाराष्ट्र सिंचन सुधारणा
- १५५ प्रकल्पांची कालवे सुधारणा.
- अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून १५ हजार कोटींचे अर्थसहाय्य मंजूर.
- शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौरपंप देणार, ८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ.
युवा वर्गासाठी विशेष योजना
- विविध शैक्षणिक संस्थांमधून दरवर्षी १० लाख युवक युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर.
- या अंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थीला दरमहा १० हजार रुपये विद्या वेतन देणार.
- बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती, अमृत यासारख्या संस्थांना २ लाख ९१ हजारांहून अधिक युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण.
- रायगडमध्ये नवीन युनानी महाविद्यालय स्थापन करणार.
- सिंधुदुर्गमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू करणार, ५०० ते १ हजार स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार.
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतल्या लाभार्थ्यांना १ हजार रुपयांच्या ऐवजी दीड हजार रुपये आर्थिक लाभ मिळणार.
बारी समाजासाठी संतश्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार.
दिव्यांगासाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना राबवणार, पहिल्या टप्प्यात ३४ हजारांहून अधिक घरे बांधणार.
पायाभूत सुविधा
- रामटेक विकास आराखड्यातल्या दुसऱ्या टप्प्यात २११ कोटींच्या कामांना मान्यता.
- सांगली जिल्ह्यात शिराळा इथं छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार.
- मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा.
- साडे ७ अश्वशक्तीपर्यंत मोफत वीज देणार.
चालू आर्थिक वर्षात २० हजार ५१ कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित.
पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार
- मुंबई महानगर क्षेत्रातील डिझेलवरचा व्हॅट २४ वरुन २१ टक्के करण्याचा प्रस्ताव.
- मुंबई महानगर क्षेत्रातील पेट्रोलवरचा व्हॅट २६ वरुन २५ टक्के करण्याचा प्रस्ताव.
- यामुळं पेट्रोल ६५ पैसे आणि डिझेल २ रुपये ७ पैशांनी स्वस्त होणार.
आसाम रायफल, CISF, ITBP, SSB, RRB मधील जवांनांना व्यवसायकरातून सूट, १२ हजार जवानांना होणार लाभ.