राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांचं अधिकृत वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही असं मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकांबद्दल समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची असून ती ग्राह्य धरू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. या परिक्षांची वेळापत्रके यथावकाश मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | October 17, 2024 7:54 PM | HSC | Maharashtra BoardExam | SSC
दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत महत्वाची अपडेट
