दहशतवाद विरोधी पथकानं डिसेंबर महिन्यात राज्यभरातून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४३ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यातल्या १९ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या चार दिवसांत विक्रोळी, नाशिक, अकोला, नांदेड आणि औरंगाबादमधून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ९ बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र तयार करून घेतली आहेत.
Site Admin | December 31, 2024 8:12 PM | Bangladeshi | Maharashtra
राज्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ४३ बांग्लादेशी नागरिकांना अटक
