ही विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते.
देशातली गरीबी, बेरोजगारी दूर व्हायला हवी, स्मार्ट शहरांप्रमाणेच स्मार्ट खेडी उभारली गेली पाहिजेत, देश पाच ट्रिलिनय अर्थव्यवस्था बनला पाहिजे तरच देश विश्वगुरू होईल, असं गडकरी म्हणाले. महायुतीच्या दहा वर्षात सहा हजार कोटी रुपये धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला, तुळजापूर तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे, असं त्यांनी सांगितलं.
भाजपा सत्तेत आल्यावर संविधान बदलेलं असा प्रचार काँग्रेसने केला. मात्र, काँग्रेसनेेेच आणिबाणीच्या काळात संविधानाच्या चिरफाळ्या उडवल्या, अशी टीका गडकरी यांनी यावेळी केलं.
गडकरी यांनी आज सांगलीमधेही सभा घेतली. प्रत्येक गावात चांगले रस्ते, सिंचनासाठी पाणी, चांगल्या शाळा, दवाखाना मिळाला असता तर तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळाला असता असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.