मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी पाठवली नसल्यामुळे माघार घेत असल्याचं, त्यांनी आज सकाळी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बातमीदारांना सांगितलं. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठीचा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, या निर्णयाशी आपला काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा शरद पवारांनी दिला.