कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागं घेतला. काँग्रेसनं राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करुन मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे लाटकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून माघारीसाठी राजेश लाटकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र लाटकर माघार घ्यायला तयार झाले नाहीत त्यामुळे मुदत संपण्याच्या १० मिनिटं आधी मधुरिमाराजे यांनीच अर्ज मागे घेतला.
Site Admin | November 4, 2024 7:13 PM | Congress | Kolhapur
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंची माघार
