विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी दाखल केल्याबद्दल तसंच पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसने विविध मतदारसंघातल्या २८ पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. ही कारवाई प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून केल्याची माहिती काँग्रेसचे प्रशासन आणि संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी दिली. कारवाई केलेल्या पदाधिकाऱ्यात आनंदराव गेडाम, शिलु चिमुरकर, सोनल कोेवे, भरत येरमे, अभिलाषा गावतुरे, राजु झोडे, प्रेमसागर गणवीर, विलास पाटील, अजय लांजेवार, आसमा चिखलेकर, याज्ञवल्क्य जिचकार, शामकांत सनेर, राजेंद्र ठाकुर, आबा बागुल आदींचा समावेश आहे.
Site Admin | November 11, 2024 7:56 PM | Assembly Elections | Congress | Maharashtra