डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून  ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून  विविध अंमलबजावणी यंत्रणांनी ५१९ कोटी ७५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू इत्यादी मुद्देमालाचा समावेश आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमतीच्या तुलनेत ही किंमत ६३ कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. तर २०१४च्या तुलनेत यात जवळपास सात पटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

 

या कालावधीत सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५ हजार ९०२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी ५ हजार ८६३ तक्रारी निकालातकाढल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा