निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाची राज्याच्या विविध भागात छापेमारी सुरु आहे.
उत्पादनशुल्क विभागानं धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत अवैध मद्यविक्री, वाहतूक प्रकरणी आतापर्यंत ७६ गुन्हे दाखल केले असून, ९३ लाख २ हजार ९७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ५८ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात घोडबंदर मार्गावर राज्य उत्पादनशुल्क विभागानं आज दुपारी केलेल्या कारवाईत गावठी दारूसह एकूण ३ लाख ३६ हजार १८०रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून, पुढला तपास सुरु आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात बेंडाळे चौकात पोलिसांनी केलेल्या तपासणीत एका वाहनात अडीच कोटी रुपयांची रोकड आढळून आली. तपासणीत ही रक्कम वैध असल्याचं समोर आल्यावर ती संबंधित व्यापाऱ्याला परत करण्यात आली.