केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांचं संपूर्ण नियंत्रण महिला करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त 45 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये 33, गोंदिया 32, सोलापूर 29 आणि मुंबई उपनगरामध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी अशी केंद्र उभारण्यात आली आहेत.
Site Admin | November 20, 2024 8:32 AM | Maharashtra Assembly Election 2024