डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदानाला सुरुवात

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८ पूर्णांक १४ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक ३० टक्के मतदान गडचिरोली जिल्ह्यात झालं. सर्वात कमी मतदान नांदेडमध्ये १३ पूर्णांक ६७ शतांश टक्के झालं. 

 

गोंदिया, चंद्रपूर, धुळे, जालना, कोल्हापूर, नंदूरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मतदानाचं प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विधानसभा मतदारसंघांचा विचार करता आरमोरीत सर्वाधिक पावणे ३१ टक्के, अहेरीत ३० पूर्णांक ६ शतांश टक्के मतदारांनी मतदान केलं. जळगाव जिल्ह्यात पाचोऱ्यात सर्वात कमी ८ पूर्णांक ५३ टक्के मतदानाची नोंद झाली. मुखेड, देगलूर, भिवंडी पश्चिम या मतदार संघात साडे १० टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद झाली आहे. 

 

नांदेड आणि पुणे जिल्ह्यात १२ ते १५ टक्के; अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, जळगाव, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात  १६ ते १९ टक्के;   भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, हिंगोली, जालना, कोल्हापूर, नंदुरबार, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात २० ते २३ टक्के ;  गोंदिया जिल्ह्यात २४ ते २७ टक्के मतदान झालं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा