विधानसभा निवडणुकीसाठी ज्या पात्र मतदारांनी अद्याप नावनोंदणी केलेली नाही त्यांना आजचा दिवस, संधी आहे. आज रात्री १२ वाजेपर्यंत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, नामनिर्देशन पत्र सादर करण्याची मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवसांपूर्वी मतदार नोंदणी करता येते. मतदार नोंदणीचे अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात अर्ज भरून जमा करावयाचे आहेत. तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि अधिक माहितीसाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १९५० वर संपर्क साधावा. व्होटर हेल्पलाईन ॲपद्वारे मतदारांना आपले नाव तपासता येईल आणि नवीन मतदार नोंदणीही करता येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
Site Admin | October 19, 2024 3:30 PM | Maharashtra Assembly Elections