डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप झालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवतील, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. 

 

१८ जागा मित्र पक्षांना देण्यासंदर्भात उद्यापासून चर्चेला सुरुवात होईल, असंही राऊत यावेळी म्हणाले. या जागांवर मुख्य तीन पक्षांपैकी कुठल्याही पक्षाने दावा केल्यास तो प्रश्न चर्चेने सोडवला जाईल, अशी माहितीही राऊत यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.