डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर

विधानसभा निवडणुकीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. निवडणूक कार्यालयांच्या स्वीप पथकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  पथकांमार्फतही येत्या  20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करण्यात येत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्यानं, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था इत्यादी ठिकाणी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

 

विधानसभा निवडणूक २०२४च्या अनुषंगानं विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई विद्यापीठानं पुढाकार घेतला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत (DLLE) अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून विभागामार्फत विविध महाविद्यालयांच्या सहकार्यानं निवडणूक साक्षरता उपक्रमांची मालिका सुरु करण्यात आली आहे. त्यात ऑनलाईन मतदार नोंदणी, मतदार जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण, इलेक्टोरल लिटरसी क्लबची स्थापना, मतदानाची शपथ आणि ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक आणि मतदान जनजागृतीसाठी व्यापक उपक्रमांचा यात समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा